

sachin pilgaonkar on DHARMENDRA
esakal
आज २४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांचे आवडते धरम पाजी काळाच्या पडद्याआड गेले. दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसलाय. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतलाय. ते बरेच दिवस आजारी होते. १० नोव्हेंबर रोजी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलेलं. त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलं. ते उपचारांना प्रतिसाद देत होते असं कुटुंबियांनी सांगितलं होतं. मात्र सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडली आणि काही तासातच त्यांच्या निधनाची वार्ता समोर आली. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांनीही त्यांना श्रद्धांजली देत भावुक पोस्ट शेअर केली आहे.