

Asambhav Movie New Song Out
esakal
Marathi Entertainment News : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘असंभव’ या चित्रपटाच्या रहस्यमय आणि उत्कंठावर्धक टिझरने, पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केलं आहे. गूढतेचा, थराराचा आणि सिनेमॅटिक वैभवाचा मिलाफ असलेल्या या टिझर, पोस्टरनंतर आता प्रदर्शित झालेलं ‘सावरताना...’ हे गाणं प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात आहे.