Sai Tamhankar Viral Videoesakal
Premier
Viral Video: '....राया आलेच मी' गाण्यावर सईचा भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, 'सईच्या अदा म्हणजे..'
Sai Tamhankar Viral Video: अभिनेत्री सई ताम्हणकर हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तीने 'आलेच मी..' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे सईची एक वेगळी ओळख आहे. आत्तापर्यंत तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हिंदी चित्रपटातही तिने आपली एक वेगळी छाप निर्माण केली. दरम्यान सई 'देवमाणूस' या मराठी चित्रपटामध्ये 'आलेच मी' या गाण्यावर थिरकताना पहायला मिळणार आहे. अशातच सईने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती लावणीवर नाचताना दिसतेय.