अभिनेता इमरान हाशमीच्या 'ग्राऊंड झिरो' चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या चित्रपटात इमरान हाशमी मुख्य भूमिकेत आहे. परंतु इमरानसोबत एक मराठी अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहे. ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून सई ताम्हणकर ही आहे. सईने स्वत: बॉलिवूड चित्रपटात काम करण्याचे अपडेट दिले आहेत.