16 जानेवारी रोजी सैफ अली खानवर वांद्र्यातील घरामध्ये घुसून चाकूने हल्ला झाला होता. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी शरीफुल इस्लाम याला ताब्यात घेतलं. सध्या या प्रकरणात पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे येत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून पकडलेला आरोपी हल्लेखोर नसल्याचं बोललं जात होतं. परंतु आता पोलिसांनी स्पष्टकरण दिलं असून आरोप तोच असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.