SAIF ALI KHAN BALD LOOK VIRAL
esakal
SAIF ALI KHAN REMOVES WIG IN FUNNY VIDEO:बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. सध्या तो त्याचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून तो दैनंदिन आयुष्यातील अपडेट्सही देताना दिसतो. अशातच त्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमध्ये सैफने चक्क टक्कल केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अभिनेत्याने खरंच आपला लूक बदलला आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.