
Saif Ali Khan Stabbed : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणानंतर भूतकाळात घडलेली अनेक प्रकरण पुन्हा चर्चेत आली आहेत. त्यातीलच एक गाजलेलं प्रकरण म्हणजे सलमानचं काळवीट शिकार प्रकरण. हम साथ साथ है सिनेमादरम्यान सलमानने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप करण्यात आला होता. अजूनही हे प्रकरण कोर्टात सुरु आहे. त्या प्रकरणात सैफ अली खानचंही नाव जोडण्यात आलं होतं.