बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याचा 'ज्वेल थीफ' चित्रपट चर्चेचा विषय ठरलाय. या चित्रपटात सैफ अली खानसोबत जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय. नेटकऱ्यांनी या चित्रपटाला पसंती दाखवली आहे. नेटकरी फक्त सैफ अली खानच्या अभिनयावरच नाहीतर त्याच्या रोलवर सुद्धा फिदा झाले आहे. चित्रपटात सैफने एका स्टाइलिश चोराची भूमिका साकारली आहे.