SALMAN KHAN birthday
esakal
Salman Khan Turns 60: बॉलूवडचा भाईजान सलमान खान याचा आज वाढदिवस. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वाढदिवसाची खास तयारी सुरु होती. कारण हा सलमानचा ६० वा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस खास बनवण्यासाठी जवळच्या लोकांनी काहीही कसर सोडली नाही. त्यांच्या फार्महाऊसवर जंगी पार्टी करण्यात आली. सलमाननं वाढदिवसाला कुटुंबासह त्याचे मित्र, चित्रपटातील कलाकारांसह इतर अनेक व्यक्तींना निमंत्रित केलं होतं.