
Marathi Entertainment News : ‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर यांनी हजेरी लावली.