SALMAN KHAN VIRAL VIDEO
Esakal
SALMAN KHAN REACTS STRONGLY TO PAPARAZZI VIRAL VIDEO: अभिनेता सलमान खान याचा मोठा चाहतावर्ग आहे. तो नेहमीच त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन चाहत्यांच्या संपर्कात राहतो. दरम्यान अशातच सलमानने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्यात. या पोस्टमध्ये त्याने पापाराझींवर नाराजी केलीय. तसंच मंगळवारी रात्री उशिरा तो मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलबाहेर स्पॉट झाला. तेव्हा हॉस्पिटलपर्यंत पाठलाग करणाऱ्या आणि फोटो काढण्यासाठी आग्रह धरणाऱ्या पापाराझींवर सलमान खान चांगलाच भडकला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत पापाराझींना चांगलीच तंबी दिलीय.