SALMAN KHAN LATEST NEWS : शाहरुखनंतर आता सलमान खानचाही मोठा निर्णय, दबंग 'या' स्पोर्ट टीमचा झाला मालक, सोशल मीडियावर चर्चा

SALMAN KHAN BECOMES OWNER OF ISPL DELHI TEAM: शाहरुखनंतर आता सलमान खाननेही मोठा निर्णय घेतला आहे. सलमान आता इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील 'नवी दिल्ली' फ्रेंचायझीचा मालक बनला आहे. सलमानच्या या नव्या इनिंगची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
SALMAN KHAN BECOMES OWNER OF ISPL DELHI TEAM
SALMAN KHAN BECOMES OWNER OF ISPL DELHI TEAMesakal
Updated on

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. दरम्यान आता सलमान केवळ अभिनयपुरता मर्यादित राहिलेला नाही. 'किंग खान' शाहरुखप्रमाणेच सलमान खानदेखील एका स्पोर्ट्स टीमचा मालक झाला आहे. मात्र फरक इतकाच की, शाहरुख जिथे क्रिकेटच्या आयपीएल लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा मालक आहे, तिथे सलमान खानने इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या टेनिस क्रिकेट लीगमधील 'नवी दिल्ली फ्रेंचायझी' संघ खरेदी केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com