Zeenat Aman: "पडद्याआड बरंच काही..."; झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या वक्तव्यावर सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया

Somy Ali Talk About Live In Relationships: सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री सोमी अलीनं (Somy Ali) झीनत अमान यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपबाबत केलेल्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.
Somy Ali Support Zeenat Aman
Somy Ali Support Zeenat Amansakal

Somy Ali Support Zeenat Aman: ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) हे विविध विषयांवर बिंधास्तपणे बोलत असतात. तसेच त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची मतं मांडत असतात. काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करुन झीनत यांनी लग्नाआधी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला चाहत्यांना दिला होता. त्यांच्या या वक्तव्याला काहींनी पाठिंबा दिली तर काहींनी त्यांना ट्रोल केलं. अशातच आता सलमान खानची (Salman Khan) एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री सोमी अलीनं (Somy Ali) झीनत अमान यांच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.

काय म्हणाली सोमी आली?

नुकत्याच एका मुलाखतीत सोमी आलीला झीनत यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, "जेव्हा मी माऊंट मेरी येथील विद्याचल येथे राहत होतो, तेव्हा झीनत जी आणि मजहर भाई (झीनतचे दिवंगत पती) माझ्या शेजारी राहत होते. जॅकी श्रॉफ आणि आयेशा (श्रॉफ) देखील शेजारी होते. आम्ही जेव्हा कधी शूटिंगला जायचो एकमेकांना भेटत होतो. झीनत जी जे काही बोलल्या त्यात मी त्यांना 100% पाठिंबा देतो. मी लिव्ह इन रिलेशनशिपच्या अजिबात विरोधात नाही. कारण जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्ही समोरच्यासाठी काही मर्यादा आखू शकता. लोक एकमेकांना जाणून घेऊ शकतात. एखाद्या व्यक्तीमध्ये तुम्हाला आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या सवयी असू शकतात, त्या तुम्ही लिव्ह इनमध्ये असताना जाणून घेऊ शकता. त्यामुळे, तुम्ही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना वैयक्तिक आवडीनिवडी आणि नापसंतीबद्दल बरेच काही शिकू शकता. त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते."

Somy Ali Support Zeenat Aman
Saira Banu: लिव्ह-इन रिलेशनशिपच्या मुद्द्यावरुन झीनत अमान आणि मुमताज यांच्यात झालेल्या वादात सायरा बानोंची उडी; म्हणाल्या...

पुढे सोमी म्हणाली, "स्त्री आणि पुरुष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असू शकतात"

"सध्या भारत, पाकिस्तान आणि जगभरात घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. झीनत जी अत्यंत हुशार आहेत आणि त्यांनी शिष्यवृत्तीद्वारे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पत्रकारितेचा अभ्यास केला आहे. त्या हुशार आणि बोलक्या आहेत. मला लोकांना सांगायचं आहे की आपण आता 1950 मध्ये राहत नाही. 2024 मध्ये, जग खूप बदलले आहे आणि एक स्त्री आणि पुरुष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असू शकतात."

"आपण अशा अनेक घटना पाहिल्या आहेत जिथे लोक एकमेकांना जाणून न घेता लग्न करतात आणि नंतर घटस्फोट घेतात. पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील विवाहांमध्ये हे अगदी सामान्य आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत हुंडा बेकायदेशीर आहे, तरीही लोक त्याबद्दल विचारण्यास लाजत नाहीत. पडद्याआड बरंच काही चालते, मग ते भारत, पाकिस्तान किंवा अमेरिका असो. झीनत यांच्याबद्दल मला एक शेवटची एक गोष्ट सांगायची आहे. त्यांनी जे सुचवले ते घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकते. तुम्ही लिव्ह-इनमध्ये असाल, तर तुमच्या जोडीदारसोबत सुसंगतता आहे की नाही हे तुम्ही शोधू शकाल.", असंही सोमीनं सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com