
Bollywood Entertainment News : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा चाहतावर्ग मोठा आहे. पण सलमानचे चाहते त्याच्या प्रेमापोटी काय करतील हे सांगणं खरंच कठीण आहे. सलमानचा सिकंदर सिनेमा नुकताच रिलीज झाला आणि त्याच्या स्क्रीनिंग दरम्यान चाहत्यांनी अक्षरशः कहर केला. सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडले त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरमधून पळावं लागलं. सोशल मीडियावत हा व्हिडीओ व्हायरल झालाय.