Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

Salman Khan Firing shutter
Salman Khan Firing shuttersakal

Salman Khan : बॉलिवुड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चार दिवसांपूर्वी आणखी दोन तरुणांना ताब्यात घेतलं होतं. पकडलेल्या दोन तरुणांनी सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करणाऱ्यांना पिस्तुल उपलब्ध करुन दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती.

सलमान खानच्या घरावर गोळीबार झालेल्या घटनेप्रकरणी चारही आरोपींना सोमवारी सत्र न्यायालयाच्या विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं. विक्की गुप्ता, सागर पाल आणि अनुज थापन यांना ८ मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

Salman Khan Firing shutter
Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

तर सोनू चांदेर याची तब्बेत खराब असल्याने त्याला न्यायालयीन कोठडी आली देण्यात आली आहे. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा झाली. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाला मोक्का लावण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com