Police Constable Death: सलमान खानच्या घराबाहेर ड्युटीवर असतानाच प्रकृती बिघडली, पोलिसाचा मृत्यू

Salman Khan Police Constable Death: अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
Salman Khan Police Constable Death

Salman Khan Police Constable Death

ESakal

Updated on

लासलगाव : अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असलेल्या मुंबई पोलीस दलातील शिपाई गणेश विठ्ठल रायते (वय ४१, रा. खडक माळेगाव, ता. निफाड) यांचे निधन झाले. कर्तव्यावर असताना अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com