

bishnoi gang threatened salman khan
esakal
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर नुकताच मुंबईतील जुहू येथे हल्ला करण्यात आला. पुष्पा पार्क येथे टर्फवर फुटबॉल खेळून झाल्यावर नेहमीप्रमाणे टायगर त्याच्या बीएमडब्ल्यूने घरी जाण्यासाठी निघाला असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्या गाडीवर गोळ्या चालवल्या. रविवारी संध्याकाळी हा सगळा प्रकार घडला. यात टायगर थोडासा जखमी झाला मात्र त्याच्या ड्रायव्हरला गोळी लागली. त्यानंतर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. मात्र ते इथेच थांबले नाहीत. त्यांनी अभिनेता सलमान खानला उघड उघड धमकी दिलीये.