Video: सलमानने केली बाप्पाची आरती तर शाहरुखने शेअर केला फोटो; धर्माची आठवण करून देणाऱ्यांना चाहत्यांनी सुनावलं

Salman Khan Shahrukh Khan Ganesh Chaturthi Celebration: सलमान खान आणि शाहरुख खान यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
salman khan shahrukh khna ganpati 2024
salman khan shahrukh khna ganpati 2024esakal
Updated on

सध्या सगळीकडे गणेश चतुर्थीची धूम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जातेय. गणरायाच्या आगमनाने सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. त्यात अनेक मराठी आणि बॉलिवूड कलाकारांच्या घरीही गणरायाचं आगमन होतं. त्यात शिल्पा शेट्टी, सारा अली खान, अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. मात्र बॉलिवूडमध्ये सर्वाधिक आकर्षणाचा बाप्पा ठरतो तो अभिनेता सलमान खान याचा. ढोलताशाच्या गजरात सलमानच्या बाप्पाची मिरवणूक निघते तर अनेक कलाकारही त्याच्या घरच्या गणेशोत्सवाला हजेरी लावतात. आताही सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तो बाप्पाची आरती करताना दिसतोय.

सलमानचा व्हिडिओ हा त्याची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांच्या घरातला आहे. यात तो त्याच्या भाच्यांबरोबर आरती करतोय. बाप्पाच्या दर्शनासाठी सलमान खानचं संपूर्ण कुटुंब उपस्थित आहे. यात अरबाज खान, सोहेल खान, सलमानचे वडील सलीम खान दिसत आहेत. इथेच सलमान बाप्पाची आरती करताना दिसतोय. मात्र त्याच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी त्याला धर्माची आठवण करून दिली आहे. आम्ही याला कधी नमाज वाचताना पाहिलं नाही, हा खोटा मुसलमान आहे इथपासून ते या पापाला क्षमा नाही अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र इथे अभिनेत्याच्या चाहत्यांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे.

सलमान नेहमीच सगळ्याच धर्माचा आदर करतो, तो कुणालाही कमी समजत नाही आणि वरचढही समजत नाही, म्हणूनच सलमान आम्हाला आवडतो असं लिहीत चाहत्यांनी नेटकऱ्यांना उत्तर दिलं आहे. तर शाहरुख खानच्या घरातही त्याने गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे. त्याने गौरी खान हीचा बाप्पाच्या मुर्तीसमोरचा एक फोटो शेअर केला होता. त्यावरही नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला होता. मात्र त्यावरही चाहत्यांनी नेटकऱ्यांची बोलती बंद केली. चाहते त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत.

salman khan shahrukh khna ganpati 2024
Actor Death: 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याचं वयाच्या ४८ व्या वर्षी निधन; झोपेतच घेतला शेवटचा श्वास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com