Actor Death: 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याचं वयाच्या ४८ व्या वर्षी निधन; झोपेतच घेतला शेवटचा श्वास

Actor Vikas Sethi Death: 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' मधील लोकप्रिय अभिनेत्याचं अचानक निधन झालं आहे. त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi fame actor vikas sethi passed away
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi fame actor vikas sethi passed awayesakal
Updated on

हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' या स्टार प्लस वरील लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिकेत झळकलेला अभिनेता विकास सेठी याचं वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी निधन झालं आहे. त्याच्या अशा अचानक मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीवर चाहत्यांना विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, विकास सेठी याला आज ८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे विकासचा मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 48 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. अभिनेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, अद्याप विकासच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना चांगलाच धक्का बसला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

विकास सेठीला स्मृती इराणी आणि एकता कपूरच्या प्रसिद्ध शो 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मधून घराघरात ओळख मिळाली. हा शो 2000 साली सुरु झाला होता. 8 वर्षे चाललेल्या या शोमध्ये विकास सेठीची महत्त्वाची भूमिका होती. याशिवाय तो 'कसौटी जिंदगी की' आणि 'कहीं तो होगा'मध्येही काम करताना दिसला. 2000 मध्ये विकास सेठी हे मोठे नाव होते. फर्स्ट पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी, 8 सप्टेंबर रोजी विकासचा मृत्यू झाला. टेली चक्करमधील वृत्तानुसार, झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने विकासचा मृत्यू झाला. मात्र कुटुंबियांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi fame actor vikas sethi passed away
Deepika- Ranveer Became Parents: लक्ष्मी आली! दीपिका- रणवीर झाले आई- बाबा; नेटकऱ्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com