Samantha Prabhu & Raj Nidimoru Secret Wedding
esakal
सामंथा प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी गुपचूप लग्न केलं. त्यांच्या लग्नानंतर त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गेल्या अनेक दिवसापासून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगत होत्या. सामंथाने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर राजचे अनेक फोटो शेअर केले होते. 1 डिसेंबर रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला केवळ 30 लोक उपस्थित होते. दरम्यान आता लग्नानंतर राजने सामंथाला एक भलं मोठं गिफ्ट दिलं आहे.