अभिनेत्री समांथा हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सिनेसृष्टीमध्ये समांथाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. समांथा चित्रपटासह वेब सीरिजमधून बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसापासून समांथा चर्चेत आहे. नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्या दोघांची खूप चर्चा झाली. दरम्यान आता समांथा पुन्हा रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहेत.