अभिनेत्री समृद्धी केळकर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून समृद्धीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. दरम्यान समृद्धीची नवी मालिका 'हळद रुसली कुंकू हसलं' नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत समृद्धी मुख्य भूमिकेत पहायला मिळतेय.