SANAI CHAUGHADE ROMANTIC PROMO
Esakal
ZEE MARATHI SANAI CHAUGHADE NEW PROMO JAY SHARVARI ROMANTIC MOMENT: झी मराठीवरील 'सनई चौघडे' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतेय. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहेत. जय आणि शर्वरी यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत शर्वरी म्हणजेच शरु ही मध्यमवर्गीय परब कुटुंबातील आहे, तर जय हा श्रीमंत खानोलकर कुटुंबाचा मुलगा आहे. गौतम आणि असावरीचं लग्न व्हावं यासाठी तेजस्विनी खानोलकरने जय समोर लग्न करण्याची अट ठेवलेली असते. जयला कधी लग्न करायचं नाही हे माहित असूनही तिने लग्नाची अट ठेवलेली असते. याच सगळ्यात जय आणि शर्वरीमध्ये चांगली मैत्री झालेलं पहायला मिळतय.