पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन आणि हर्षवर्धन राणेचा 'सनम तेरी कसम' चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्यावेळी फ्लॉप ठरला. परंतु या चित्रपटातील गाणे प्रचंड गाजले. दरम्यान तब्बल 9 वर्षानंतर 'सनम तेरी कसम' चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात आला आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पुन:प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटामध्ये सनम तेरी कसम सर्वांधिक कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने दोन दिवसातच जुन्या कमाईचे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.