

sandip pathak
esakal
पुण्यातील ऐतिहासिक बालगंधर्व रंगमंदिरात ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या अजरामर एकपात्री नाटकाचा ६०० वा प्रयोग अत्यंत दिमाखात पार पडला. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रंगलेला हा प्रयोग केवळ हास्यकल्लोळामुळेच नाही, तर अभिनेता संदीप पाठक यांना मिळालेल्या एका अनोख्या 'सरप्राईज'मुळे अधिकच संस्मरणीय ठरला.