

aakhari sawal
esakal
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काही चित्रपट असे असतात की ते फारसा गाजावाजा न करता प्रदर्शित होत असतात. 'आखरी सवाल' हा त्यापैकीच एक चित्रपट. अभिनेता संजय दत्त, समीरा रेड्डी, नमाशी चक्रवर्ती. अमित साद, नीतू चंद्रा आदी कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजित मोहन वारंग यांनी केले आहे. या चित्रपटाचे कथानक गुरू-शिष्य यांच्यातील तीव्र संघर्षावर बेतलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि त्याने गेल्या शतकभर केलेले कार्य यांच्या भोवती ही कथा फिरणारी आहे.