

'वेलकम' आणि 'वेलकम 2'च्या यशानंतर दिग्दर्शक अहमद खान 'वेलकम टू द जंगल' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेला बराच काळ या सिनेमाची चर्चा सुरुये. प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत असणाऱ्या या सिनेमाबाबत एक निराशाजनक बातमी समोर आलीये. बातमीनुसार, अभिनेता संजय दत्त यांनी एक -दोन दिवस सिनेमाचं शूटिंग केल्यानंतर हा सिनेमा सोडला.
‘वेलकम’ आणि ‘वेलकम 2’ मध्ये अनेक कलाकारांनी काम केलं आहे. फिल्ममध्ये अक्षय कुमारच्या व्यतिरिक्त तुषार कपूर, श्रेयस तळपदे, सुनील शेट्टी, दिशा पाटनी, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस, परेश रावल, अर्शद वारसी, जॉनी लीवर, कृष्णा अभिषेक आणि राजपाल यादव यांच्याबरोबर अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. पिंकविला दिलेल्या बातमीनुसार संजय दत्त आता या सिनेमाचा हिस्सा नसून त्यांनी हा सिनेमा करण्यास नकार दिला आहे.
बातमीनुसार संजय यांनी खराब तब्येतीमुळे हा सिनेमा करण्यास त्यांनी नकार दिला आहे. असं म्हंटलं जातंय कि त्यांना या सिनेमात अक्शन करायची नव्हती आणि त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव त्यांना ते करायला जमत नसल्यामुळे त्यांनी ही फिल्म सोडली. एक दिवस शूट केल्यानंतर त्यांचा मूड बदलला आणि त्यांनी हा सिनेमा सोडला. तर काही रिपोर्ट्सनी असं म्हंटलं आहे कि संजय यांनी जवळपास 15 दिवस या सिनेमाचं शूटिंग केलं होतं.
याबाबत सिनेमाच्या टीमने अजूनही कोणतंही वक्तव्य केलं नाहीये. किंवा सिनेमाच्या कलाकारांनीही याबाबत कोणतीच अपडेट शेअर केलं नाहीये.
संजय दत्त सध्या साऊथ सिनेमांमध्येही काम करत आहेत. तेलुगू फिल्म डबल स्मार्ट, कन्नड़ फिल्म, के.डी.-द डेविल या सिनेमांमध्ये ते काम करत आहेत.