Sanjay Dutt Marathi Statement
esakal
PRATAP SARNAIK ASKS SANJAY DUTT TO SPEAK IN MARATHI: महाराष्ट्रात मराठी भाषेवरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती करण्यात आली आहे. त्यातच आता अभिनेता संजय दत्तच्या एका व्यक्तव्यानं नवं वळण मिळालय. मुंबईत रविवारी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात संजय दत्त सहभागी झाला होता. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा उपस्थित होते. तेव्हा मंचावर संजय दत्तने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. परंतु सरनाईक यांनी त्यांना मराठी बोलण्याची विनंती केली.