मी दोनदा स्वतःला संपवणार होतो... संजय जाधव यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले, 'कुणाशी काय बोलणार...'

SANJAY JADHAV ON SUICIDE AND DEPRESSION: जेव्हा संजय जाधव यांचे चित्रपट फ्लॉप झालेले तेव्हा त्यांच्याही मनात जीव देण्याचा विचार आलेला. मात्र मित्रांमुळे ते थांबले असं ते म्हणालेत.
SANJAY JADHAV ON DEPRESSION

SANJAY JADHAV ON DEPRESSION

ESAKAL

Updated on

आपल्या दिग्दर्शनाने आणि सिनेमॅटोग्राफीने इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण करणारे आणि प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे लोकप्रिय कलाकार म्हणजे संजय जाधव. 'दुनियादारी' या चित्रपटाने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. मात्र त्यानंतर अनेक वर्ष त्यांनी एकही हिट सिनेमा दिला नाही. त्यांचे बहुतेक सिनेमे फ्लॉप झाले. त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. इतके की दोनदा त्यांच्या मनात स्वतःला संपवण्याचा विचार आला. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संजय यांनी त्या दिवसांबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com