डिट्टो बाबाची कॉपी! संकर्षण कऱ्हाडेच्या मुलाला पाहिलंत का? स्टेजवर वडिलांची एन्ट्री होताच दिली क्युट रिएक्शन; व्हिडिओ व्हायरल

SANKARSHAN KARHADE SON :अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याचं नाटक पाहायला त्याचा मुलगा आला होता. तेव्हा बाबाला पाहून त्याने दिलेली प्रतिक्रिया लाखमोलाची होती.
sankarshan karhade

sankarshan karhade son

esakal

Updated on

मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या 'कुटुंब कीर्तन' हे नाटक करतोय. प्रेक्षकांचा या नाटकाला चांगला प्रतिसाद लाभतोय. चाहत्यांनी आपलं कौतुक करावं असं प्रत्येक कलाकाराला वाटतं. मात्र आपल्या कुटुंबाकडून मिळणारी कौतुकाची थाप ही प्रत्येक कलाकारासाठी लाखमोलाची असते. त्यात तो आपला मुलगा असेल तर? असंच काहीसं संकर्षणसोबतही घडलंय. अभिनेत्याचा चिमुकला लेक वडिलांचं नाटक पाहायला गेला होता. वडिलांची एंट्री होताच त्याने जी प्रतिक्रिया दिली ती पाहून नेटकरी त्याच्यावर फिदा झालेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com