

Marathi Entertainment News : आपल्या मराठी संस्कृतीचा आणि श्रद्धांचा अविभाज्य भाग असलेला ‘गोंधळ’. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजरा होणारा एक पारंपरिक विधी आणि हाच पारंपरिक गोंधळ आता रुपेरी पडद्यावर अवतरतोय! राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर दिग्दर्शित आणि डावखर फिल्म्स प्रस्तुत ‘गोंधळ’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच स्थानिकांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. या सोहळ्यात खऱ्या अर्थाने गोंधळ घालण्यात आला. पारंपरिक वाद्यांचे नाद, नृत्य, आणि मंत्रोच्चारांनी वातावरण भारून गेले होते. या पारंपरिक सादरीकरणाने लाँच सोहळ्याला एक आगळं-वेगळं सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झालं.