
अभिनेता सैफ अली खान याच्यावर दोन महिन्यांपूर्वी हल्ला झाला होता. रात्री त्याच्या घरात घुसलेल्या चोराने त्याच्यावर हल्ला केला होता. या चाकूहल्ल्यात सैफ गंभीर जखमी झालेला. त्याच्या पाठीला मोठी दुखापत झालेली. त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर करिना, इब्राहिम, सारा, जेह, तैमूर, सोहा सगळ्यांनीच त्याच्यासाठी इस्पितळात धाव घेतलेली. तेव्हा करिनाने याप्रकरणावर भाष्य केलं होतं. आता सारा अली खानने या घटनेवर वक्तव्य केलंय.