

Actor Satish Shah Funeral
News : ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं काल 25 ऑक्टोबरला निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 74 वर्षं होतं. मूत्रपिंड अचानक निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. आज मुंबईमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.