Satish Joshi: ज्येष्ठ अभिनेते अभिनेते सतीश जोशी यांचे निधन; स्टेजवरच घेतला अखेरचा श्वास

Satish Joshi: सतीश जोशी यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Satish Joshi
Satish Joshisakal

Satish Joshi: ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी (Satish Joshi) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नुकतीच अभिनेते राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सतीश जोशी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या पोस्टमध्ये राजेश देशपांडे यांनी लिहिलं आहे की, रंगोत्सवात स्टेजवरच सतीश जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

राजेश देशपांडे यांची पोस्ट

"आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले जाण्यापूर्वी त्यांनी अभिनय पण केला होता, ओम शांती ओम.", असं राजेश देशपांडे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. राजेश देशपांडे यांच्या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी सतीश जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेते अतुल काळे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सतीश जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "जोशी गुरुजींचे आज निधन झाले. माझ्या कुटुंबाचे आणि माझे ते आधारस्तंभ होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती", असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं.

सतीश जोशी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच मालिकांमध्ये काम केलं आहे. सतीश यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. त्यांच्या निधनानं प्रेक्षकांना धक्का बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com