Premachi Goshta 2 Movie Review
esakal
दिग्दर्शक सतीश राजवाडेने मुंबई पुणे मुंबई (भाग १ आणि २), प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करते असे रोमँटिक धाटणीचे यशस्वी चित्रपट दिलेले आहेत. त्याने आपल्या चित्रपटामध्ये प्रेमाचा वेगळा आलेख मांडलेला आहे. मैत्री, प्रेम आणि विश्वास यांची सांगड घालताना त्या त्या व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्यदेखील उत्तमरीत्या टिपली आहेत. त्यामुळे त्याचे चित्रपट खमंग आणि चटपटीत वाटतात.