
Marathi Entertainment News : मराठी भाषा वळवावी तशी वळते, असं म्हणतात. मराठी भाषेचा गोडवा हा जितका शब्दांत असतो तितकाच तो माणसाच्या स्वभावातही असतो. आपल्या भाषेचा आणि स्वभावाचा हाच गोडवा घेऊन प्राकृत मराठी भाषेत सयाजी शिंदे भाईगिरी करणार आहेत. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ याआगामी मराठी चित्रपटात ‘आप्पा’ या भाईच्या भूमिकेत सयाजी शिंदे दिसणार आहेत. हा भाई शुद्ध मराठीत बोलत अनेकांची विकेट काढताना दिसणार आहे.