

Kairi Marathi Movie Review
esakal
Marathi Entertainment News : दिग्दर्शक शंतनू रोडेने ‘जयजयकार’ आणि ‘गोष्ट एका पैठणीची’ असे चित्रपट बनविले होते. या दोन्ही चित्रपटांचा आशय आणि विषय निराळा होता. ‘गोष्ट एका पैठणीची’ला राष्ट्रीय पुरस्कारासह अन्य काही पुरस्कार लाभलेले होते. त्यामुळे त्याच्या ‘कैरी’कडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. आता हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला असून, हलकेफुलके कथानक, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, कोकणातील नयनरम्य लोकेशन्स त्याचबरोबर सुरेल संगीताची साथ मिळाल्याने ही कलाकृती लक्षवेधी ठरली आहे.