जम्मू-काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे. या हल्ल्याबाबत देशभरातून निषेध व्यक्त केला जातोय. सेलिब्रिटीसुद्धा सोशल मीडियावर या घटनेचा निषेध करताना दिसत आहेत. अशातच शाहरुख खानने सुद्धा या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'हे कृत्य मानवेला काळिमा फासणारं असून मी या घटनेचा निषेध करतो.' अशी प्रतिक्रिया त्याने दिलीय. दरम्यान याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आता शाहरुखचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.