ना महागडं डाएट, ना भारी जेवण! शाहरुख खान दिवसातून फक्त २ वेळा खातो; फिटनेस रुटीन ऐकून व्हाल थक्क

SHAH RUKH KHAN FITNESS AND DIET ROUTINE AT AGE 61:शाहरुख खान वयाच्या ६१ व्या वर्षीही फिट कसा आहे? दिवसातून दोन वेळा जेवण, डाएटमध्ये मोड आलेली कडधान्यं, ग्रिल्ड चिकन आणि रात्री उशिरा व्यायाम; जाणून घ्या त्याचं फिटनेस रुटीन
SHAH RUKH KHAN FITNESS

SHAH RUKH KHAN FITNESS

esakal

Updated on: 

SHAH RUKH KHAN EATS ONLY TWO MEALS A DAY: बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याचा चाहतावर्ग केवळ भारतातच नाही, तर जगभरात आहे. आज म्हणजे २ नोव्हेंबर रोजी शाहरुख खानचा ६१ वा वाढदिवस आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्याचा फिटनेस आणि एनर्जी पाहून अनेकजण थक्क होतात. आजही तो चित्रपटांमध्ये अॅक्शन सीन्स करताना दिसतो. त्यामुळे शाहरुख इतक्या वर्षांनंतरही स्वतःला फिट कसं ठेवतो, त्याचा डाएट आणि व्यायामाचं रुटीन नेमकं काय आहे, असे प्रश्न चाहत्यांना पडतात. दरम्यान, त्याने वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये आपल्या जीवनशैलीबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

Loading content, please wait...