Shah Rukh Khan : शाहरुख खान आणि गौरी खानला दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस; समीर वानखेडेंच्या याचिकेवर दिला 'हा' आदेश

Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाने शाहरुख खान आणि गौरी खानला नोटीस जारी केली आहे. ही नोटीस समीर वानखेडे यांच्या मानहानीच्या खटल्यावरून देण्यात आली आहे. मालिकेत नार्कोटिक्स अधिकाऱ्याचे पात्र वानखेडेंवर आधारित असल्याचा त्यांचा दावा आहे.
“Shah Rukh Khan and Gauri Khan arrive at the Delhi High Court amid legal notice over ‘Bards of Bollywood’ defamation suit by Samir Wankhede.”

“Shah Rukh Khan and Gauri Khan arrive at the Delhi High Court amid legal notice over ‘Bards of Bollywood’ defamation suit by Samir Wankhede.”

esakal

Updated on

Summary

मालिकेने त्यांची प्रतिमा जाणूनबुजून नकारात्मक दाखवल्याचा आरोप आहे.
वानखेडेंनी मालिकेवर बंदी आणि ₹२ कोटींच्या भरपाईची मागणी केली आहे.
रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्सला ७ दिवसांत उत्तर द्यावे लागणार असून पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानला झटका दिला आहे. आर्यन खानची पहिली मालिका "बॅड्स ऑफ बॉलीवूड" प्रदर्शित झाल्यापासून, माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आहेत. त्यांनी "बॅड्स ऑफ बॉलीवूड" विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी ८ ऑक्टोबर रोजी झाली. समीर वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला. उच्च न्यायालयाने शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या निर्मिती कंपनी, रेड चिलीज एंटरटेनमेंट विरुद्ध नोटीस जारी केली आणि ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सकडून उत्तर मागितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com