

8-foot snake spotted at Shah Rukh Khan's Mannat
esakal
पावसाळ्यात ठिकठिकाणी साप निघण्याच्या घटना घडत असतात. मात्र बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या घरीही साप निघाला असं म्हटलं तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल. सध्या बाहेर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई सारख्य शहरात देखील साप दिसून येत आहेत. पावसाने बिळात आणि गटारात पाणी शिरल्याने ते मानवी वस्तीत सुरक्षित ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकार अभिनेता शाहरुख खान याच्या राहत्या घरात २ साप आढळून आले. ते दोन्ही सॅप एकमेकांना गुंडाळलेल्या अवस्थेत होते.