बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान त्याचा बंगला 'मन्नत'च रिनोवेशन करत आहे. यामुळे त्याचं कुटुंब सध्या मुंबईच्या पाली हिल परिसरातील दोन आलीशान डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत आहे. गौरी खान यांनी या प्रोजक्टसाठी महाराष्ट्र कोस्टल जोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे मंजुरी मागितली होती. त्यामुळे आता मन्नतमध्ये दोन अजून फ्लोअर बनवले जाणार आहे. या बंगलाच्या एरिया 616 मीटर वाढण्यात आला आहे. रिनोवेशनसाठी जवळपास 25 कोटी रुपयांचा येणार आहे.