SHAH RUKH KHAN FACES TROLLING AFTER VIRAL VIDEO
esakal
Shah Rukh Khan Viral Video : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. सौदी अरेबियामध्ये पार पडलेल्या 'जॉय अवॉर्ड्स' मध्ये शाहरुखने उपस्थिती लावली होती. या अवॉर्ड्समधील त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक चाहता फोटो काढत असताना शाहरुखने हातातून फोन काढून घेतला. त्याने चाहत्याला पाहून केलेल्या हावभावामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलय.