
आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज अभिनेते राजा गोसावी यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी प्रचंड मोलाचं योगदान दिलं. त्यांच्यासारखा अभिनेता होणे नाही. त्यांना विनोदाचा राजा म्हणत. त्यांनी 'असला नवरा नको गं बाई', 'दीड शहाणे', 'अवघाचि संसार', 'चिमण्यांची शाळा', 'वरदक्षिणा', 'लाखाची गोष्ट' अशा अनेक चित्रपटात काम केलं. त्यांच्या अभिनयाला तोड नव्हती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रचंड लोकप्रियता देखील पाहिली आणि हलाखीचा काळही पाहिला. आता राजा गोसावी यांच्या कन्या शमा देशपांडे यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मृत्यूबद्दल सांगितलं आहे.