Shambhuraj Khutwad Lifts Prajakta Gaikwad During Jejuri Visit:
esakal
प्राजक्ता गायकवाड ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. तिने शंभुराज खुटवडसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी पारंपारिक पद्धतीनं लग्न केलंय. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. तिने नंदीबैलावर केलेल्या एन्ट्रीमुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. अशातच आता तिचे देवदर्शनाला गेलेले व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.