

Marathi Entertainment News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित एक आगळावेगळा ऐतिहासिक रॅप साँग 'शंभू राजा' हे नुकतंच प्रदर्शित झालं असून, या गाण्याने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. इतकंच नाहीतर अल्पावधीतच हे गाणं रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. आधुनिक रॅपच्या माध्यमातून इतिहास मांडण्याचा हा अनोखा प्रयत्न मानला जात आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन ब्रम्हा यांनी केले आहे. त्यांच्या सर्जनशील दिग्दर्शनामुळे पारंपरिक इतिहास आणि आधुनिक संगीत यांचा सुंदर संगम या गाण्यांत साधला गेला आहे. विशेष म्हणजे, या रॅप साँगमध्ये लहान मुलांचा अभिनय पाहायला मिळतो, ज्यामुळे गाण्याला एक वेगळीच भावनिक आणि शैक्षणिक छटा लाभली आहे.