

sharad pawar and zapatlela movie connection
esakal
'झपाटलेला' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलेलं. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमाईचे नवे रेकॉर्ड केलेले. या चित्रपटातला बोलका बाहुला कुणीही विसरू शकत नाही. आजही तात्या विंचू प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. तात्या विंचू म्हंटला की आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र महेश कोठारे यांच्या या सिनेमाचं आणि शरद पवार यांचं कनेक्शन तुम्हाला ठाऊक आहे का? लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, विजय चव्हाण यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटासाठी शरद पवार खास मदत केलेली.