Shashank Ketkar And Mrunal Dusanis: मृणाल-शशांक पुन्हा दिसणार नव्या मालिकेत? सोशल मीडियावरील फोटो पाहून नेटकरी खुश

मृणाल-शशांक पुन्हा दिसणार नव्या मालिकेत? सोशल मीडियावरील फोटो पाहून नेटकरी खुश
New Marathi Serial: मृणाल-शशांक पुन्हा दिसणार नव्या मालिकेत? सोशल मीडियावरील फोटो पाहून नेटकरी खुश
Shashank Ketkar and Mrinal Dusanissakal

Shashank Ketkar and Mrinal Dusanis new Marathi serial: कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ ही शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस यांची मुख्य भूमिका असलेली मालिका आजही प्रेक्षकांची लाडकी आहे. सिद्धार्थ-अनुची गोड प्रेमकथा असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. आजही अनेकजण ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही मालिका आवर्जून बघतात

. शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस या कलाकारांची या मालिकेत मुख्य भूमिका होती. नुकतंच शशांकने शेअर केलेल्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

New Marathi Serial: मृणाल-शशांक पुन्हा दिसणार नव्या मालिकेत? सोशल मीडियावरील फोटो पाहून नेटकरी खुश
Family Star Box Office Collection: मृणाल ठाकूर आणि विजय देवरकोंडाच्या केमिस्ट्रीने मनं जिंकली; 'फॅमिली स्टार'ने दोन दिवसांत केली एवढी कमाई

मृणाल काही दिवसांपूर्वीच भारतात परत आली. बऱ्याच काळाने भारतात परतल्यावर ती तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट घेते आहे. नुकतंच अभिनेता शशांक केतकरने तिच्या सोबतचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटोज शेअर करत त्याने “Sidhharth meets Anu ! @mrunaldusanis_official welcome back… हे मन बावरे ही मालिका संपून ४ वर्ष झाली पण “अजूनही परत परत बघतो “अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते, आजही! मग मंडळी, ही जोडी पुन्हा बघायला आवडेल का ? @colorsmarathi” असा प्रश्न चाहत्यांना कॅप्शनमध्ये विचारला. शशांकच्या या प्रश्नावर अनेकांनी होकार दिला आहे. तर अनेकांनी ही मालिका पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.

२०१८ साली कलर्स मराठीवर ही मालिका सुरु झाली होती. एक यशस्वी बिझनेसमन आणि एक विधवा तरुणी यांची एक वेगळी लव्हस्टोरी या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सिद्धार्थ- अनुची जोडी अल्पावधीतच हिट झाली. २०२० मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

या मालिकेनंतर मृणाल पुन्हा तिच्या नवऱ्याकडे परदेशात राहायला गेली. दरम्यानच्या काळात मृणालच्या लेकीचा नुरवीचा जन्म झाला आणि आता चार वर्षांनी मृणाल पुन्हा भारतात परतली आहे आणि आता ती कायमची इथेच राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

New Marathi Serial: मृणाल-शशांक पुन्हा दिसणार नव्या मालिकेत? सोशल मीडियावरील फोटो पाहून नेटकरी खुश
Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

दरम्यान , शशांकने शेअर केलेल्या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांनी पुन्हा एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. एकाने “कोणाला नाही आवडणार अनु आणि सिद्धार्थ पुन्हा बघायला ❤ सुखाच्या सरीने हे मन बावरे ❤” अशी कमेंट केली आहे तर एका युजरने,”हो नक्की आवडेल तुम्हाला दोघांना पुन्हा एकत्र नवीन project मध्ये काम करताना बघायला. तुमचं कलाकार म्हणून काम करताना एकमेकांशी असलेले coordination खूप सुंदर आहॆ म्हूणनच तुमची jodi पुन्हा बघायला नक्की आवडेल.” असं म्हणत त्यांनी एकत्र काम करावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.

आता मृणाल कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे जाणून घेण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत. तर शशांक सध्या स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ या मालिकेत काम करतोय. त्याची ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com