Sonakshi Sinha: सोनाक्षीला मिळणार नाही शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीतील हिस्सा; लग्न नाही 'हे' आहे कारण

Shatrughna Sinha Property: शत्रुघ्न सिन्हा यांची २१० कोटींची संपत्ती आहे. मात्र सोनाक्षीला त्यातलं काहीही मिळणार नाहीये.
sonakshi sinha
sonakshi sinha sakal

लोकप्रिय अभिनेते शत्रुघ्न सिन्हा सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहेत त्याचं कारण म्हणजे त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिचं लग्न. सोनाक्षीने अभिनेता झहीर इकबाल याच्याशी लग्नगाठ बांधली. या लग्नामुळे शत्रुघ्न हे आपल्या मुलीवर नाराज दिसून आले. तर तिचा भाऊ लव या लग्नाला आलाच नव्हता. अशातच सोनाक्षीने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं असल्याच्या चर्चा आहे. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या संपत्तीमधून सोनाक्षीला एक रुपयाही देणार नाहीत. त्यांनी ही गोष्ट स्वतः मान्य केली होती.

शत्रुघ्न सिन्हा यांची बिहार आणि मुंबईतच नाही तर मेहरौली, डेहराडून आणि दिल्लीतही मालमत्ता आहे. त्यांनी संपत्ती २१० कोटींच्या आसपास आहे. त्यांच्या मुंबईतील ‘रामायण’ या घराची किंमत ८८ कोटींच्या घरात आहे. निवडणुकीचा अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीबद्दल सांगितलं होतं. पण या संपत्तीमधील एकही रुपया ते आपली मुलगी सोनाक्षीला देणार नाही. याचा खुलासा खुद्द त्यांनीच एका मुलाखतीत केला होता.

एका मुलाखतीत त्यांना तुम्ही तुमच्या मुलीला आणि मुलाला संपत्तीतील किती वाटा देणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देताना ते म्हणाले, 'मी माझ्या मुलीला काहीही देणार नाही. माझी मुलगी आता स्वावलंबी आहे आणि चांगली कमाई करते. तिला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि मला तिचा अभिमान आहे. शिवाय माझ्या मुलीने स्पष्ट सांगितलंय की तिला माझ्याकडून कशाचीही गरज नाही आणि मला तिच्या या विश्वासाचा अभिमान आहे. आजपर्यंत तिने जे काही मिळवलंय, ते तिने स्वत:च्या बळावर केलंय आणि ती सदैव आनंदी राहो हीच मी प्रार्थना करतो.

सोनाक्षीने नुकतंच मुंबईत नवं घर घेतलं ज्याची किंमत १४ कोटींच्या घरात आहे. मात्र यातील ११ कोटी तिने वडिलांकडून उधार घेतले होते. तर सोनाक्षी स्वतः १०० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.

sonakshi sinha
Rupali Bhosale: म्हणून नव्या घराच्या नेमप्लेटवर नाहीये रुपाली भोसलेचं नाव; कारण सांगत म्हणते- कागदपत्र जरी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com