

SHAHNAAZ GILL
ESAKAL
'बिग बॉस'मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. सध्या आयपीएल २०२६ सुरू आहे. शहनाज आयपीएलच्या मॅचदरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या टीमला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली होती. तिला असं रॉयल चॅलेंजर्सची जर्सी घातलेली पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं मात्र यामुळे तिच्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एका सदस्याच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलंय.